Ad will apear here
Next
‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप
देवेंद्र फडणवीसनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची सर्व प्रकारची विघ्ने टळावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २१ जुलैला महामृत्युंजय जप व पूर्णाहुती यज्ञ करण्यात येणार आहे.

पक्षाच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याखेरीज विविध आघाड्यांच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘भाजयुमो’च्या वतीने सव्वा लाख महामृत्युंजय जप आणि पूर्णाहुती यज्ञ करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हिंगणा रोडवरील महादेव मंदिरात जप केला जाणार आहे. अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी ही माहिती दिली.
या वेळी संदीप जोशी, भोजराज डुंबे, संदीप जाधव, प्रमोद पेंडके, देवेंद्र दस्तुरे, विवेक तरासे, चंदन गोस्वामी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZFCBE
Similar Posts
‘सामान्य कार्यकर्ता देशाचा राष्ट्रपती’ नागपूर : ‘पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, ज्याने कोणत्याही अपेक्षेशिवाय संघटना वाढविण्यावर भर दिला, तो कार्यकर्ता ६५ टक्के जास्त मते घेऊन देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा करिष्मा फक्त भाजपमध्येच होऊ शकतो,’ असे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.   रामनाथ कोविंद भारताचे १४वे
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली : पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नाशिक : ‘गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर, प्रगतिशील आणि राज्याला समर्पित असे सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. फडणवीस सरकारचे प्रगतिपुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या उत्थानाची कहाणी आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये जाहीर सभेत केले
नव्या मतदारांवर भाजपचे लक्ष नागपूर : आगामी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून तयारी चालविली आहे. निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव्या मतदारांना आतापासूनच आपलेसे करण्यासाठी भाजपने योजना आखली आहे. या मतदारांची नोंदणी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत
प्रभागात राबवले अनेक उपक्रम नागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मनीषा काशीकर यांनी गेल्या काही दिवसांत प्रभागातील अनेक कामे मार्गी लावली व अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये रस्त्याचे भूमिपूजन, मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महिलांना शुभेच्छा, सारीकाबाद कॉलनी आणि आरएमएस कॉलनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language